एक्स्प्लोर
न्यूझीलंडवर तब्बल 186 धावांनी मात, भारतीय महिला संघाचे 6 विक्रम

1/10

मिताली राज या सामन्यात सामनावीराची मानकरी ठरली. तिने आतापर्यंत पाच वेळा सामनावीराचा मान मिळवला आहे. महिला क्रिकेटमध्ये पाचव्यांदा सामनावीर होणारी मिताली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर ठरली.
2/10

या सामन्यात मिताली राज सर्वात जास्त वयात शतक ठोकणारी पहिलीच फलंदाज ठरली. तिने वयाच्या 34 व्या वर्षी शतक साजरं केलं, जे आतापर्यंत कुणीही केलेलं नाही.
3/10

या सामन्यात भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस झूलन गोस्वामीने एक विकेट घेतली. यासोबतच भारतीय महिला क्रिकेटमध्ये 31 विकेट घेणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली.
4/10

राजेश्वरी गायकवाडने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. तिने 15 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. यापूर्वी हा विक्रम एकटा बिष्टच्या नावावर होता. एकताने 18 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.
5/10

महिला विश्वचषकात भारतीय संघाचा मोठ्या धावसंख्येने होणारा हा पहिलाच विजय आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकाही संघाला 186 धावांपेक्षा जास्त अंतराने हरवलं नव्हतं.
6/10

महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीराची मानकरी स्टेफनी टेलर ठरलेली आहे. तिच्या नावावर 19 सामनावीराचे पुरस्कार आहेत. या यादीत आता मिताली दुसऱ्या स्थानावर आहे.
7/10

याच सामन्यात भारतीय महिला संघाने विजयासोबतच 6 विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
8/10

गोलंदाजी करताना राजेश्वरी गायकवाडने 5 विकेट घेत न्यूझीलंडचा अर्धा संघ एकटीने माघारी पाठवला.
9/10

या सामन्यात मिताली राज आणि राजेश्वरी गायकवाडने दमदार खेळी करुन न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला.
10/10

कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाची लढत आता ऑस्ट्रेलिया महिला संघाशी होणार आहे.
Published at : 16 Jul 2017 10:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
