एक्स्प्लोर
सचिन तेंडुलकर आणि सोनू निगम यांच्या ‘या’ फोटोमागचं सत्य काय?

1/6

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता गायक बनला आहे. तसं सचिनला संगीताची आवड आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. पण आपल्या नव्या डिजिटल अॅपच्या प्रसारासाठी सचिननं स्वतः गाणं गायलं आहे. तेही सोनू निगमच्या साथीनं.
2/6

सचिनचं हे गाणं येत्या रविवारी रात्री दहा वाजता सचिनच्या चाहत्यांना 100 एमबी या त्याच्या अधिकृत मोबाईल अॅपवरून ऐकता येणार आहे.
3/6

लेखक परासर यांनी सचिन आणि सोनू निगम यांचा फोटो ट्वीट करत प्रश्न विचारला आहे की, “सोनू निगम, तुम्ही बॅटसोबत काय करत आहात? आणि तुमच्यासोबत दुसरी व्यक्ती कोण आहे? नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहात का?” प्रसन्ना यांच्या ट्वीला सचिन तेंडुलकरने कोट करुन, सोनू निगम यांना प्रश्न विचारला आहे. मात्र, या फोटोबाबत काहीही बोलण्यास सचिनने टाळलं आहे. त्यामुळे ट्वीटरसह सोशल मीडियावर याबाबत चर्चा आणखी वाढल्या.
4/6

सोशल मीडियावर सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सोनू निगम यांच्या हातात बॅट, तर सचिन तेंडुलकरच्या हातात माईक दिसत आहे. मात्र, या फोटोवरुन सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
5/6

लेखक परासर यांनी सचिन आणि सोनू निगम यांचा फोटो ट्वीट करत प्रश्न विचारला आहे की, “सोनू निगम, तुम्ही बॅटसोबत काय करत आहात? आणि तुमच्यासोबत दुसरी व्यक्ती कोण आहे? नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहात का?”
6/6

सचिननं रेकॉर्ड केलेलं हे पहिलं गाणंही अर्थातच क्रिकेटला समर्पित केलं आहे. एका जमान्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याआधी लक्ष केंद्रीत करण्यासाठी सचिन अनेकदा गाणी ऐकायचा. आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर सचिन स्वतः गायकाच्या भूमिकेत शिरला आहे.
Published at : 31 Mar 2017 06:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
