एलिस विलानी आणि मेग लॅनिंगच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत पाच बाद 148 धावांची मजल मारली होती. सदर्न स्टार्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला टीमचा वेस्ट इंडीजकडून हा पहिलाच पराभव ठरला. याआधीच्या आठ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला लोळवलं होतं.
2/8
स्टेफानी टेलरनं 57 चेंडूंत सहबा चौकारांसह 59 धावांची खेळी रचून कॅरिबियन टीमचा विजय निश्चित केला. त्यानंतर डिअँड्रा डॉटी आणि ब्रिटनी कूपरनं विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
3/8
हेली मॅथ्यूजनं 45 चेंडूंमध्य सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 66 धावांची खेळी केली.
4/8
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार स्टेफानी टेलरनं हेली मॅथ्यूजच्या साथीनं 120 धावांची सलामी दिली.
5/8
6/8
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्या ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं होतं.
7/8
वेस्ट इंडिजच्या महिला संघाने तीनवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
8/8
विंडीजच्या महिलांचा हा क्रिकेटमधला पहिलाच विश्वचषक विजय ठरला आहे.