त्यानंतर कोहलीने सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं. त्यामुळे कोहलीच्या नावावर 12 शतकं जमा झाली आहेत.
2/12
यानंतर सुमारे 7 महिन्यांनी कोहलीच्या नावावर अकराव्या शतकाची नोंद झाली. 13 ऑगस्ट 2015 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत कोहलीने 103 धावा ठोकल्या होत्या.
3/12
मग पुन्हा याच कसोटी मालिकेत कोहलीने आणखी एक शतक ठोकलं. सिडनी कसोटीत 8 जानेवारी 2015 रोजी कोहलीने 147 धावा झळकावल्या होत्या. कोहलीचं हे दहावं शतक होतं.
4/12
यानंतर पुन्हा कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच मेलबर्नमध्ये 169 धावा ठोकून नववं शतक पूर्ण केलं. 28 डिसेंबर 2014 रोजी त्याने ही कामगिरी केली होती.
5/12
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अडिलेड कसोटीत कोहलीने सलग दोन शतकं झळकावली होती. 11 आणि 13 डिसेंबर 2014 रोजी कोहलीने सातव्या आणि आठव्या शतकाची नोंद केली होती. यावेळी कोहलीने 115 आणि 141 धावा ठोकल्या होत्या.
6/12
न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत कोहलीने 105 धाव ठोकून सहावं शतक पूर्ण केलं. ही कसोटी अनिर्णित राहिली होती.
7/12
मग आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये 119 धावा करुन कोहलीने पाचव्या शतकाची नोंद केली.
8/12
यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत 107 धावा ठोकून कोहलीने चौथं शतक झळकावलं.
9/12
विराटने तिसरं शतक इंग्लंडविरुद्ध झळकावलं. नागपूरमध्ये 13 डिसेंबर 2012 रोजी कोहलीने पुन्हा 103 धावाच केल्या होत्या.
10/12
टीम इंडियाचा डॅशिंग कसोटी कर्णधार विराट कोहलीने आणखी एक धडाकेबाज शतक ठोकलं आहे. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दिवसअखेर नाबाद 144 धावांची खेळी केली. कोहलीचं हे कसोटीतील 12 वं शतक आहे. कोहलीच्या या बारा शतकांवर एक नजर
11/12
कोहलीचं दुसरं शतक न्यूझीलंडविरुद्ध होतं. 31 ऑगस्ट 2012 रोजी बंगळुरु कसोटीत कोहलीने 103 धावा ठोकल्या होत्या.
12/12
कोहलीने कसोटीतील पहिलं शतक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ओव्हल कसोटीत ठोकलं. 2012 साली झालेल्या या सामन्यात त्याने 116 धावा केल्या होत्या.