एक्स्प्लोर
मतदान ओळखपत्र कसं मिळवाल?

1/10

राज्यघटनेने देशाच्या प्रत्येक नागरिकाला काही विशेष अधिकार दिले आहेत. या अधिकारामधीलच एक मतदानाचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून तुम्ही तुमची सरकार प्रति पसंती किंवा नाराजी व्यक्त करू शकता. आज आम्ही तुम्हाला तुमचं मतदानाचं ओळखपत्र कसे मिळवता येईल? याची माहिती देत आहोत.
2/10

18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे. या मतदानासाठी तुम्हाला मतदान ओळखपत्र गरजेचे असते.
3/10

मतदान ओळखपत्राचा वापर केवळ मतदानासाठीच नव्हे तर रहिवाशी दाखल्यासाठी, बॅंकेत खाते उघडण्यासाठी, फोनचे कनेक्शन मिळवण्यासाठी, तसेच इतर सरकारी कामांसाठीही करता येतो.
4/10

ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत.
5/10

ओळखपत्र बनवताना रहिवाशी दाखल्यासाठी रेशन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, पाणी बिल, वीजेचे बिल, टेलिफोन बिल आदी कागदपत्रांची गरज असते.
6/10

तसेच वयाच्या दाखल्यासाठी तुमचा जन्माचा दाखला किंवा दहावी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्रही वापरू शकता.
7/10

ओळखपत्र बनवण्यासाठी जर तुमच्याकडे वयाच्या दाखल्याचे कोणतीही पुरावे उपलब्ध नसल्यास, तुम्ही मतदान यादीतील तुमच्या आई-वडिलांच्या क्रमांकासोबत त्यांच्या हस्ताक्षराचे घोषणापत्र देऊ शकता. या घोषणापत्रासोबत तुम्हाला एक दुसरा अर्जही भरून द्यावा लागतो.
8/10

या सर्व कागदपत्रांची जमवाजमव केल्यानंतर 6 नंबर फॉर्म भरून ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता.
9/10

तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्जही करू शकता, किंवा जवळच्या मतदान आयोगाच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकता.
10/10

हा अर्ज सादर केल्यानंतर एक महिन्यांनी तुम्ही मतदान आयोगाच्या कार्यालयात जाऊन ओळखपत्र प्राप्त करू शकता.
Published at : 15 Aug 2016 09:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
