बॉलिवूडचे काही चित्रपट असे आहेत की जे टीव्हीवर सुपरहिट ठरले. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रदर्शित झाले त्यावेळी हे चित्रपट सुपर फ्लॉप ठरले होते. हे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरपर्यंत आलेच नाही. पाहूयात असे चित्रपट जे टीव्हीवर सुपरहिट ठरले, मात्र त्यावेळी प्रेक्षकांनी नाकारलं.
2/7
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीसाठी जर कोणत्या सिनेमाची आठवण येते तर तो म्हणजे 'सिलसिला'. हा चित्रपट त्याकाळी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
3/7
बीआर चोप्रांच्या 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात त्या काळातील तमाम बडे स्टार होते. पण सिनेमा टीव्हीवर हिट झाला, पण प्रेक्षक त्यावेळी थिएटरमध्ये गेले नाहीत.
4/7
टीव्हीवर कॉमेडी सिनेमांच्या रेसमध्ये नेहमीच आघाडीवर असलेला सिनेमा म्हणजे 'अंदाज अपना अपना'. मात्र आमीर, सलमान, करिष्मा आणि रविना यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सुपरफ्लॉप ठरला होता.
5/7
शो मॅन राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा भारतीय चित्रपटांचा वारसा मानला जातो. पण त्यावेळी प्रेक्षकांनी सिनेमाला सपशेल नकारच दिला होता.
6/7
'शान' हा रमेश सिप्पींचा आणखी एक मोठा सिनेमा होता. निर्मात्यांना सिनेमाकडून फार अपेक्षा होत्या. शान सिनेमाची स्टारकास्ट तगडी असतानाही सिनेमा सुपरफ्लॉप ठरला.
7/7
जय-वीरुची दोस्ती, दमदार डायलॉग, गब्बरच्या शानदार भूमिकेनंतरही रमेश सिप्पींचा 'शोले' सिनेमा फ्लॉपच घोषित केला होता. दमदार भूमिका, ड्रामा, अक्शनने परिपूर्ण 'शोले' पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये आलेच नव्हते. मात्र त्यानंतर जणू काही चमत्कारच झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षकांचे पाय थिएटरकडे वळले.