‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा त्याचा प्रवास उलगडला आहे.
2/6
‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असं सांगत ही खेळी आपण आपल्या आई-बाबांना समर्पित करणार असल्याचं सचिनने सांगितलं.
3/6
"क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला मला 22 वर्षांची तपश्चर्या करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता", असं सचिन यावेळी म्हणाला.
4/6
गप्पांची ही अनोखी मैफिल 22-23 मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात झी मराठीवर पाहता येईल.
5/6
सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
6/6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला 'हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली. सचिनने त्याच्या आगामी 'सचिन: अ बिलियन ड्रीम' या सिनेमानिमित्ताने 'हवा येऊ द्या'च्या मंचावर धमाल-मस्ती केली.