आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तीभाव होता. ती छायाचित्रे घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करपूर्वक माफी मागतो.
2/5
3/5
रायगडावरील मेघडंबरीत चढून फोटोसेशन करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखने, चौफेर टीकेनंतर माफीनामा सादर केला आहे. कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. केवळ भक्तीभावनेतून फोटो काढले. पण यामुळे जर कोणीही दुखावलं असेल तर त्यांची मी अंत:करणापासून माफी मागतो, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे.
4/5
अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, पानिपतकार लेखक विश्वास पाटील आणि सहकारी 5 जुलै रोजी रायगडावर गेले होते. तिथे त्यांनी राजदरबारातील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी मेघडंबरीत चढून फोटो काढले होते. ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले होते. मात्र मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने रितेश देशमुखवर तुफान टीका होत होती.
5/5
सोशल मीडियावर अनेकांनी रितेश देशमुखवर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यानंतर रितेश देशमुखने माफीनामा सादर केला.