आतापर्यंत आईस बकेट चॅलेंज, फिटनेस चॅलेंज अशी विविध आव्हानं सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आली होती. ही चॅलेंजेस जीवाला धोकादायक ठरत नाहीत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र व्हायरल होण्याच्या नादात जीवावर बेतू नये, म्हणजे झालं.
6/10
हा धोकादायक चॅलेंज फॉलो करताना तु्म्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकताच पण इतरांच्या जीवाशीही खेळता. त्यामुळेच जाणकारांनी या चॅलेंजच्या नादी न लागण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे.
7/10
काय आहे किकी चॅलेंज? - 'किकी, डू यू लव्ह मी? आर यू रायडिंग?' असे ड्रेक- इन माय फीलिंग या 'किकी' गाण्याचे शब्द आहेत. चालत्या गाडीतून उडी मारायची आणि चालत असलेल्या गाडीच्याच वेगाने गाण्यावर नाचत चालायचं, असं या चॅलेंजचं स्वरुप.
8/10
आतापर्यंत जगभरातील अनेक तरुण किकी चॅलेंज करताना अपघातग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच मुंबई पोलिसांनीही तरुणाईला नसतं फॅड कॉपी न करण्यास बजावलं आहे.
9/10
आंतरराष्ट्रीय पातळीवर किकी चॅलेंज गाजत आहेच. मात्र नोरा फतेही, अदाह शर्मा, निया शर्मा, प्रियांक शर्मा यासारखे भारतीय सेलिब्रेटी किकी चॅलेंज करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य तरुणही त्याचं अंधानुकरण करण्याची शक्यता आहे.
10/10
सोशल मीडियावर सध्या 'किकी चॅलेंज' चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे. चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी साँग परफॉर्म करायचं असं हे चॅलेंज! मात्र हे चॅलेंज जीवावर बेतण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातील पोलिसांनी तरुणांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.