परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
2/4
झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसंच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
3/4
परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जारी केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.
4/4
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे.