एक्स्प्लोर
परळमधील क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर मोठी आग

1/6

मुंबईतील परळमध्ये असलेल्या क्रिस्टल टॉवरमध्ये मोठी आग लागली.
2/6

या रहिवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली असून टॉवरमध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
3/6

रहिवासी इमारत असल्याने काही जण अडकले असून त्यांना क्रेनच्या सहाय्याने वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत 10 ते 15 जणांना वाचवलं आहे. काहींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
4/6

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
5/6

परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवरमध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली.
6/6

तसंच तीन अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 22 Aug 2018 10:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
