एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये देण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, शासन निर्णय जारी

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

मुंबई : महायुतीमधील घटकपक्षांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी गेमचेंजर भूमिका पार पाडणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी 2026 च्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे.  या योजनेच्या लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागानं निधीची जमवाजमव सुरु केली आहे. सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 98. 45 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. 

सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागानं 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय 18 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. 

जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार

महिला व बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जाणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आणि जानेवारी 2026 च्या सुरुवातीच्या काही दिवसात देण्यात आला होता. यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता सामाजिक न्याय विभागानं लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी  98.45 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्यानं लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसात लाडकी बहीणच्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची रक्कम अदा केली जाते. तर, ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना दरमहा लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलं आहे. जुलै 2024 मध्ये योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. त्यापैकी केवळ 1 कोटी 90 लाख महिलांकडून ई केवायसी करण्यात आली. म्हणजेच 55 लाखांपेक्षा अधिक महिलांकडून ई केवायसी करण्यात आली नाही. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 1 कोटी 60 लाख महिलांना देण्यात आली आहे. सध्या ई केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget