एक्स्प्लोर

Shambhuraj Desai : जयकुमार गोरे हे मोठे आणि दिग्गज मंत्री... त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते, मंत्री शंभूराज देसाई यांची टीका

Shambhuraj Desai : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री जयकुमार गोरे यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.

सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणाची येणार यावरून सस्पेन्स कायम आहे. काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते.  शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर खोचक टीका करत ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो, असं म्हटलं आहे.

शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता असा प्रश्न विचारल्यावर मला तो अधिकार नाही मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत, अशी खोचक टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे.

चमत्कार करायचा नाही पण चमत्कार करावा लागल्यास करु: जयकुमार गोरे

सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले असून एक अपक्ष आमच्या सोबत आलेला आहे, अशा परिस्थितीत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये म्हटलं होतं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असं जयकुमार गोरे यांनी आज म्हटलं.  

दरम्यान, साताऱ्यात भाजपाला बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शंभराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांची नंदनवदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. 

सातारा जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी 27 जागा जिंकल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. सातारा जिल्हा परिषदेतील बहुमताचा आकडा पार करण्या इतकं संख्याबळ दोन्ही पक्षांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि शिवसेनेनं 16 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमदेवार देखील विजयी झाला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संख्या बळ 37 पर्यंत पोहोचतं आहे. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस :20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
Embed widget