एक्स्प्लोर
ऑलिम्पिक मेडल नदीत फेकून देणारा बॉक्सर
1/7

वर्णभेदाविरुद्ध लढाई बॉक्सिंग रिंगच्या बाहेरही अलीचं वेगळेपण वेळोवेळी उठून दिसलं. साठच्या दशकात वर्णभेदाविरुद्ध लढाईचाही अली आवाज बनला. पुढे इराकच्या कैदेतील अमेरिकन युद्धकैद्यांना सोडण्याचं अपील करण्यासाठी त्याने सद्दाम हुसेनशीही वाटाघाटी केल्या. बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना चोपणारा अली, प्रत्यक्षात शांतीचाही दूत बनला. अलीने त्यानंतर स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं आहे. पर्किन्सन्स सारखा आजारही त्याला रोखू शकला नाही. वयाची सत्तरी पार केल्यावर अनेक जण विस्मृतीत जातात. पण अली द ग्रेटेस्ट म्हणूनच ओळखला गेला. आजही त्याची ख्याती ग्रेटेस्ट म्हणूनच राहिल.
2/7

अलीला हरवणारा पहिला बॉक्सर अलीचे बॉक्सिंगमधले पंच जितके कडक असायचे, तेवढंच त्याचं बोलणं तिखट होतं. अलीच्या कारकीर्दीतील सर्वात एक्सायटिंग काळ म्हणजे जो फ्रेझरबरोबरची त्याची रायव्हलरी. फ्रेझर वर्ल्ड चॅम्पियन अलीला हरवणारा पहिला बॉक्सर ठरला. मात्र अलीने पुढच्या दोन लढती जिंकून फ्रेझरवर वर्चस्व मिळवलं. फ्रेझर गेल्या वर्षीच हे जग सोडून गेला. पण आजही त्याच्या आणि अलीच्या रायव्हलरीची कहाणी सांगितली जाते. द फाईट ऑफ द सेंच्युरी, थ्रिला इन मनिला या दोघांमधल्या गाजलेल्या लढती, शाब्दिक चकमकी दंतकथेचा भाग बनल्या आहेत.
Published at : 04 Jun 2016 11:01 AM (IST)
Tags :
BoxerView More























