पक्षांच्या संवर्धनासाठी त्यांना हवा असणारा अधिवास, पाणी आणि अन्न दिल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी मावळा ग्रुपने सुरू केलेल्या या उपक्रमात एक मूठ धान्य पक्षांसाठी देऊन सहभाही व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
2/6
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हीच अवस्था जंगलांमध्ये आहे. दिवसेंदिवस पक्षांची संख्या कमी होत चालल्याने निसर्गचक्रासाठी ती चिंतेची बाब आहे.
3/6
तसंच याच परिसरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्या स्वच्छ करून, त्या कापल्या आणि त्यामध्ये पाणी भरुन ठेवलं. प्रत्येक व्यतीने एका झाडावर पाणी आणि धान्याचं भांडं ठेवून त्या झाडाचे आणि पक्षाचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
4/6
वारणा , कोडोली या परिसरातील मंगल कार्यालयात लग्नानंतर पडलेल्या अक्षता गोळा करून आणि प्रत्येक घरातून एक मूठ धान्य असं दीड क्वींटल धान्य जमवून ते स्वच्छ करून पक्षांना देण्यासाठी पावन गडावर आणलं.
5/6
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावनगड परिसरातील जंगलात दुर्मिळ पक्षांचा अधिवास आहे. मात्र या परिसरात माणसाने शिरकाव केल्याने, पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पक्षांना जीवनदान देण्यासाठी वारणा नगर परिसरातील मावळा प्रतिष्ठानच्यावतीने नवीन वर्षाचा संकल्प म्हणून एक मूठ धान्य पक्षांसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात तब्बल 300 तरुणांनी सहभाग घेतला.
6/6
नवीन वर्षाचा नवीन संकल्प करत कोल्हापुरातील मावळा प्रतिष्ठानच्यावतीनं, पन्हाळा गडजवळ पावनगड परिसरातील पक्षांसाठी मुबलक पाणी आणि धान्याची व्यवस्था केली आहे. हा उपक्रम इथून पुढं अखंडपणे चालणार आहे.