17 वर्षांपूर्वी एकता कपूरच्या कुसुम या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नौशीन अली सरदार 15 ऑगस्ट पासून पुन्हा एका छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या मालिकेचं नाव 'अलादीन' आहे.
2/8
मात्र नौशीन अली सरदारने प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा फेटाळाला आहे.
3/8
यावेळी नौशीनने सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. पण हा फोटो शेअर करताच नौशीन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
4/8
'गंगा' मालिकेत नौशीनला पाहिल्यानंतर तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावाही अनेकांनी वर्तवला होता.
5/8
टीव्हीवरील 'गंगा' या मालिकेत ती अखेरची दिसली होती. मागील काही वर्षांत तिने आपल्या लूकमध्ये फारच बदल केला.
6/8
'कुसुम' ही मालिका 2001 मध्ये सुरु झाली होती, तर 2005 मध्ये संपली. मालिकेत नौशीनसह अनुज सक्सेना मुख्य भूमिकेत होते. एकता कपूरची ही मालिका होती.
7/8
"15 वर्षांपूर्वी जशी दिसायचे तशीच आता दिसायला हवी, असं जर कोणाला वाटत असेल तर ते शक्य नाही. वाढत्या देशासह प्रत्येक जण वेगळे दिसायला लागतात. अशावेळी मी पहिल्यासारखीच दिसेन अशी अपेक्षा कशी काय कोण करु शकतं. फोटो टेक्नॉलॉजी आणि फिल्टरटा वापर करुन कोणी फोटो ए़़डिट करुन सुंदर दिसू शकतं. जर सगळेच फोटोशॉपचा वापर करु शकता तर मी का करु शकत नाही," असं नौशीन म्हणाली.
8/8
या फोटोमध्ये नौशीन आधीपेक्षा फारच वेगळी दिसत आहे. ट्रोलर्सनी नौशीनच्या फोटोवर वाईट कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो एडिटेड असल्याचा दावा, ट्रोलर्सनी केला आहे. मात्र तिनेही ट्रोलर्सना आपल्या अंदाजात सडेतोड उत्तर दिलं.