रॅमिरेजने त्याच्या चिमुकल्या मुलीला त्याच्या टी शर्टमध्ये बांधले आणि नदीत उडी मारली. टेक्ससच्या दिशेने तो पोहू लागला. परंतु वेगाने वाहणाऱ्या खोल नदीपुढे त्याचे काहीही चालले नाही. नदीत बुडून त्याचा आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला.
2/9
ऑस्कर अल्बर्टो मार्टिनेज रॅमिरेज (25) हा त्याच्या 23 महिन्यांच्या मुलीला पाठीवर घेऊन रियो ग्रँड नदीमार्गे पोहत अमेरिकेतील टेक्सस येथे जाणार होता. परंतु नदीत बुडून बापलेकीचा मृत्यू झाला. या बापलेकीचा मृतदेह नदीच्या किनारी सापडला. कोणीतरी त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला.
3/9
मेक्सिकोमधील रियो ग्रॅंड नदीच्या किनाऱ्यावर एका बाप-लेकीच्या मृतदेहांचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
4/9
या आयलान कुर्दीच्या फोटोची आठवण करुन देणारा अजून एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटोदेखील अॅलन कुर्दीसारखाच आहे. घटनाही अगदी तशीच, केवळ जागा बदलली आहे.
5/9
हा फोटो पाहून लोक निःशब्द झाले. जगभरातील निर्वासितांचं दुःख, त्यांच्या समस्या हा एक फोटो सांगून जातो.
6/9
अमेरिकेची नवी व्हिसा पॉलिसी या बापलेकीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
7/9
आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या लेकिला घेऊन तो नदीमार्गे पोहत अमेरिकेला जाणार होता. परंतु त्याचे हे स्वप्न अपुरे राहिले.
8/9
ऑस्कर रॅमिरेज याला चांगले आणि नवे आयुष्य जगण्यासाठी साल्वाडोरहून अमेरिकेला जायचे होते. परंतु अमेरिकेच्या नव्या व्हिसा पॉलिसीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने अमेरिकेत घुसखोरी करण्याचे ठरवले.
9/9
चार वर्षांपूर्वी आयलान कुर्दी नावाच्या एका सिरियन मुलाचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला होता. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.