एक्स्प्लोर
... तर युवराज आणि रैनासाठी टीम इंडियाची दारं खुली : रवी शास्त्री
1/8

फिटनेस आणि कामगिरी चांगली असेल तर कोणताही खेळाडू राष्ट्रीय संघात खेळू शकतो. यामध्ये क्षेत्ररक्षण सर्वात महत्त्वाचं आहे, असंही रवी शास्त्री म्हणाले.
2/8

दरम्यान रैना आणि युवराज आता केवळ फिटनेसच्या बळावरच टीम इंडियात पुनरागमन करु शकतात, हे रवी शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालं आहे.
3/8

युवराज सिंह देखील फिटनेस आणि खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर आहे. फिटनेस टेस्टमध्ये अपात्र ठरल्यामुळे रैना आणि युवराज संघातून बाहेर असल्याची माहिती आहे.
4/8

श्रीलंकेला क्लीन स्विप दिल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारतात होणाऱ्या या मालिकेत 5 वन डे आणि 3 टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
5/8

यादरम्यानच एका वृत्त वाहिनीशी बोलताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्याबाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे.
6/8

युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत रवी शास्त्री यांना प्रश्न विचारण्यात आला. ते दोघे फिट असतील तर त्यांना संघात घेतलं जाईल, असं उत्तर रवी शास्त्री यांनी दिलं.
7/8

सुरेश रैना जवळपास दोन वर्षांपासून म्हणजे ऑक्टोबर 2015 पासून वन डे संघातून बाहेर आहे. यावर्षात त्याने एकमेव टी-20 सामना खेळला होता.
8/8

रवी शास्त्री यांनी धोनीच्या फिटनेसचंही कौतुक केलं आणि तो 2019 विश्वचषकासाठी पहिली पसंत असल्याचं सांगितलं.
Published at : 15 Sep 2017 09:23 PM (IST)
View More























