श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं.
2/8
श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात धोनीने विजयी चौकार ठोकला.
3/8
यावेळी धोनी श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजया आणि उपुल थरंगा यांच्याशी बातचीत करत होता.
4/8
संपूर्ण मालिकेत श्रीलंकेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी श्रीलंकेचे युवा खेळाडू धोनीकडून टिप्स घेत होते.
5/8
या सामन्यानंतर टीम इंडिया बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात व्यस्त होती, तर धोनी श्रीलंकेच्या खेळाडूंना गुरुमंत्र देत होता.
6/8
धोनी धनंजयाला क्रिकेटमधील बारकावे शिकवत होता, हे त्याचे हावभाव पाहून स्पष्ट दिसत होतं.
7/8
भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.
8/8
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.