अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड कनेक्शनमध्ये चोरी-चोरी चुपके-चुपके सिनेमाचं नावंही घेतलं जातं. हिरे व्यापारी आणि सिने फायनान्सर भरत शाह याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. या सिनेमात सलमान खान आणि प्रिती झिंटा हे मुख्य भूमिकेत होते. तर या सिनेमासाठी अंडरवर्ल्डचा पैसा लावण्यात आल्याची चर्चा होती. मकोका कोर्टानं भरत शाहला अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एक वर्षाची शिक्षाही सुनावली होती.
2/6
दाऊद शिवाय आणखी एका डॉनची प्रेम कहाणी जगासमोर आली होती. अबू सालेम आणि मोनिका बेदी यांची. अबू सलेममुळे मोनिकाला अनेक सिनेमात काम मिळालं होतं. अनेक वर्ष यांच्यात नातेसंबंध होते. मात्र, सालेमच्या अटकेनंतर मोनिका त्याच्यापासून वेगळी झाली. अबू सालेम सध्या जेलमध्ये आहे.
3/6
अभिनेत्रींशिवाय दाऊदसोबत हिरोंचेही फोटो चर्चेत राहिले.
4/6
फक्त मंदाकिनी नव्हे तर सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी पाकिस्तानी मॉडेल अनीता अयुबचं देखील दाऊद सोबत नाव जोडलं गेलं होतं. असंही म्हटलं जातं की, जेव्हा सिनेनिर्माता जावेद सिद्दीकीनं 1995 साली अनीताला आपल्या सिनेमात घेण्यास नकार दिला होता त्यावेळी दाऊननं आपल्या हस्तकांकरवी सिद्दीकीची हत्या केली होती.
5/6
दाऊद इब्राहिम आणि बॉलिवूडचं कनेक्शनमधील सगळ्यात मोठं नाव आहे मंदाकिनी. 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमातून चित्रपट विश्वात खळबळ माजवणारी अभिनेत्री मंदाकिनी ही दाऊदच्या मनात भरली होती. पहिल्यांदा दाऊदसोबत मंदाकिनीच्या संबंधांची चर्चा होती. एवढंच नव्हे तर, मंदाकिनीच्या सिनेमात दाऊदचा पैसा असतो अशीही चर्चा होती. त्यानंतर दाऊद आणि मंदाकिनी यांचा हा फोटो बराच चर्चेत राहिला होता.
6/6
अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध यावर नेहमीच चर्चा होते. ममता कुलकर्णी, मंदाकिनी, मोनिका बेदी यांची नावं अंडरवर्ल्डसोबत जोडली गेली.