Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Oct 2016 11:42 AM (IST)
1/10
आकांक्षानं सांगितलं की, तिला फक्त लग्नापासून स्वातंत्र्य हवं आहे. यासाठी तिला पैसे किंवा युवराजच्या कुटुंबाकडून दुसरं काहीही नको.
2/10
त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिनं आता बिग बॉसमध्ये येण्याचा फैसला केला आहे.
3/10
त्यावेळी आकांक्षाच्या भावानं तिला समजावलं की, तिला तिचं आयुष्य पुढं नेणं गरजेचं आहे.
4/10
आकांक्षानं तेव्हा आपल्या पालकांना याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. एक वेळ असाही होता की, तिच्याकडे फक्त 3000 रुपये होते आणि ती आपल्या सासरहून पळून जाण्याचा विचार करीत होती.
5/10
'लग्नानंतर एक वेळ असं वाटलं की, जगण्यापेक्षा मरण बरं.' असंही आकांक्षा म्हणाली.
6/10
आकांक्षानं बिग बॉसमध्ये एंट्रीच्या वेळी सलमानला सांगितलं की, 'त्या लग्नातून आपण पुढे निघून गेलो आहोत. पण अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाही.'
7/10
लग्नानंतर युवराजनं आकांक्षा आणि आपल्या भावाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या कुटुंबात तिचं स्वागत केलं होतं.
8/10
आकांक्षा शर्माचं लग्न 2014 साली युवराजचा भाऊ जोरावर सिंह यांच्याशी झालं होतं. पण हे लग्न 4 महिने देखील टिकू शकलं नाही.
9/10
यामधील एक स्पर्धक ही स्टार क्रिकेटर युवराज सिंहची वहिनी आकांक्षा शर्मा आहे.
10/10
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसच्या 10व्या पर्वाला सुरुवात झाली असून यामध्ये 15 स्पर्धक सहभागी झाले आहेत.