त्यामुळे वाढत्या लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी रात्री 9 नंतर टेलिव्हीजन वाहिन्यांवरी जंक फूडच्या जाहिरातींचे प्रसारण बंद केले पाहिजे असा सल्ला शोधकर्त्यांनी दिला आहे. तसेच लोकांमध्येही वाढत्या लठ्ठपणासंदर्भात जागरूकता वाढली पाहिजे असेही सांगितले आहे.
2/7
जवळपास 15 ते 20 टक्के महिलांना वाढत्या लठ्ठपणासोबत गर्भ कॅन्सरचा धोका असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे.
3/7
दरवर्षी जवळपास 18000 नागरिक कॅन्सरने पीडित असतात. यातील मुख्य कारण धुम्रपान असल्याचे सांगण्यात येते. पण गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी लठ्ठपणाही कारणीभूत असतो, हे 78 % लोकांनाही माहित नसते. तसेच दोन तृतीयांश म्हणजे 69 % लोकांना ब्रेस्ट कॅन्सरला लठ्ठपणाच कारणीभूत आहे, याची माहिती नसते. याशिवाय अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजे 53% लोकांना पेन्क्रियाज (स्वाधूपिंड)चा कॅन्सर लठ्ठपणामुळे होतो हे माहित नसते.
4/7
डेली मेलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्ष नमुद करण्यात आले आहेत. आगामी 20 वर्षात जवळपास 6 लाख 70 हजार लोकांना कॅन्सरसारखे आजारांनी ग्रासले असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम 2.5 % स्वास्थ सेवेवर होणार आहे.
5/7
ब्रिटेनमधील या रिसर्चमध्ये रिप्रोडक्टिव्ह म्हणजेच प्रजननासंबंधीचे जे कॅन्सर आहेत, त्याला धुम्रपानासोबत लठ्ठपणालाही कारणीभूत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
6/7
संशोधकांना यावेळी कॅन्सर आणि शरिरातील अतिरिक्त चरबीमुळे सेक्स हार्मोन आणि एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर वाढल्याचे आढळले. यामुळे ब्रेस्ट आणि गर्भातील पेशींची कार्यक्षमता प्रमाणापेक्षा जास्त वाढते.
7/7
सध्या जगभरात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. मात्र, नुकत्याच एका रिपोर्टनुसार वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण कॅन्सर असल्याचे समोर आले आहे.