स्टीफन फ्लेमिंगः आयपीएलमुळे परदेशी खेळाडूही भारताच्या संस्कृतीशी चांगलेच जोडले गेले आहेत. स्टीफन फ्लेमिंग हा देखील त्यापैकीच एक आहे. फ्लेमिंगने न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याने आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी लीलया सांभाळली आहे. फ्लेमिंग भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूंशी परिचीत आहे.
2/6
रिकी पॉण्टिंग : ऑस्ट्रेलिया संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंग परिचीत आहे. पॉण्टिंगचा अनुभव हेच संघासाठी सर्व काही ठरु शकतं. पॉण्टिंगमध्ये युवा खेळाडूंना ओळखण्याची क्षमता आहे. त्याने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.
3/6
पॅडी अप्टनः टीम व्यवस्थापन आणि कोचिंग या दोन गोष्टींसाठी पॅडी अप्टन ओळखला जातो. मूळचा दक्षिण अफ्रिकेचा असलेला अप्टन त्याच्या शांत स्वभावामुळे चांगले प्रशिक्षक म्हणून पुढे आला आहे. अप्टन 2011 साली भारताचे मेंटल कंडिशनिंग कोच होते. शिवाय त्याने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
4/6
जेसन गिलेस्पी : इंग्लंडच्या मुख्य कर्णधारपदाची जबाबदारी जेसन गिलेस्पीने काही काळ सांभाळली आहे. गिलेस्पी सध्या ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गिलेस्पीचा भारतात खेळण्याचा अनुभव चांगला समजला जातो.
5/6
डॅनियल व्हेटोरीः न्यूझीलंड संघाचा कर्णधार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार, प्रशिक्षक असा प्रवास राहिलेला डॅनियल व्हेटोरी भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चांगला उमेदवार ठरु शकतो. भारताचा सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि व्हेटोरी यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे व्हेटोरीची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यास या दोघांच्या संबंधांचा संघाला चांगला फायदा होऊ शकतो.