माजी क्रिकेटपटू श्रीशांतही बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर श्रीशांतने आपला मोर्चा मनोरंजन विश्वाकडे वळवला. हा त्याचा तिसरा रिअॅलिटी शो आहे.
2/11
अभिनेत्री सृष्टी रोडने इष्कबाज, छोटी बहू 2 आणि सरस्वतीचंद्र मालिकेत सृष्टीने काम केलं आहे.
3/11
मध्य प्रदेशचा शेतकरी सौरभ पटेल आणि बिझनेसमन शिवाशिष मिश्रा हे दोघे मित्रही बिग बॉसचे स्पर्धक असणार आहेत.
4/11
राजस्थानच्या सबा खान आणि सोमी खान या बहिणीही बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.
5/11
पब्लिक वोटिंगद्वारे आऊटहाऊस विजेते कोलकात्याची रश्मी बनिक आणि रोडीज् स्पर्धक कृती वर्मा बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.
6/11
हरयाणाचे दोन मित्र पोलिस कर्मचारी निर्मल सिंग आणि वकील रोमिल चौधरीही बिग बॉसमध्ये सहभागी झाले आहेत.
7/11
मराठमोळी ग्लॅमगर्ल नेहा पेंडसेही बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. मराठी सिनेमा, मालिकांसोबतचं हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. त्याशिवाय तिने बॉलिवूड, तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही काम केलं आहे.
8/11
अभिनेता करणवीर बोहरा 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील प्रेमच्या व्यक्तिरेखेमुळे सर्वप्रथम प्रसिद्धीस आला. सौभाग्यवती भव, कुबूल है आणि सध्या नागिन 2 मालिकांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत.
9/11
अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिमने 'ससुराल सिमर का' मालिकेत केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. दीपिकाला सर्वाधिक मानधन मिळाल्याची चर्चा आहे. तिच्याकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं.
10/11
'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम गायक दीपक ठाकूर आणि त्याची चाहती उर्वशी वाणीही बिग बॉसमध्ये सहभागी झाले आहेत.
11/11
65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा यांनी 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथरुसोबत बिग बॉसच्या घरात गृहप्रवेश केला आहे.