एक्स्प्लोर
Expensive Laptops : लॅपटॉप आहे की हँडबॅग! सोने आणि हिऱ्यांपासून बनविलेल्या या लॅपटॉपची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Expensive Laptops : ट्यूलिप ई-गो डायमंड हा लॅपटॉप आहे जो हँडबॅगसारखा दिसतो. लॅपटॉपचे अनोखं डिझाईन, लॅपटॉपवरील हिरे आणि महागड्या किंमतीमुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे.

Expensive Laptops
1/6

ट्यूलिप ई-गो डायमंड हा लॅपटॉप आहे जो हँडबॅगसारखा दिसतो. लॅपटॉपचे अनोखं डिझाईन, लॅपटॉपवरील हिरे आणि महागड्या किंमतीमुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे.
2/6

Tulip E-Go Diamond : अनेकदा तुम्ही इतरांना लॅपटॉपसाठी बॅग खरेदी करताना पाहिलं असेल. पण हँडबॅगसारखा दिसणारा लॅपटॉप तुम्ही ऐकला आहे का? Tulip E-GO हा एक लॅपटॉप आहे जो लेडीज बॅगसारखा दिसतो. तुम्ही हा लॅपटॉप हँडबॅगप्रमाणे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता.
3/6

जगातील सर्वात महागड्या लॅपटॉपच्या यादीत Tulip E-GO डायमंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या लॅपटॉपची किंमत इतकी जास्त आहे की, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या लॅपटॉपची किंमत $355,000 (अंदाजे 29,190,000 रुपये) आहे.
4/6

या लॅपटॉपची खास गोष्ट म्हणजे हा हँडबॅग किंवा पर्ससारखा दिसतो. लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड वेबकॅम देण्यात आला आहे. तुम्हाला लॅपटॉपसह अँटी रिफ्लेक्शन स्किन दिसेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या लॅपटॉपमध्ये AMD Turion 64-bit CPU देण्यात आला आहे.
5/6

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॅपटॉपमध्ये एकूण 1GB - 2GB मेमरीचे 2 स्लॉट दिले गेले आहेत. हा लॅपटॉप 2006 मध्ये बनविला गेला होता. त्यामुळे यामध्ये आधुनिक सुविधा अपडेटेड करण्यात आल्या नाहीत. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 100GB,160GB हार्ड ड्राइव्ह सपोर्ट मिळत आहे.
6/6

लॅपटॉपचं वजन साधारण अडीच किलो आहे. लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तुम्हाला लॅपटॉपमध्ये 2 USB 2.0 पोर्ट, 1 Mini USB पोर्ट आणि Bluetooth 2.0 सपोर्ट मिळेल. हा लॅपटॉप सॉलिड पॅलेडियमपासून बनविला गेला आहे, लॅपटॉपवर चमकदार हिरे बसवले आहेत.
Published at : 11 Feb 2023 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
