एक्स्प्लोर
Photo: टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड, हिटपासून फ्लॉपपर्यंत, प्रत्येक खेळाडूंची A टू Z माहिती
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.
(Photo Credit: Virat Kohli Twitter Account)
1/12

आयपीएलमध्ये गोलंदाजांचा समाचार घेणारा भारताचा सलामीवीर के एल राहुलला टी-20 विश्वचषकात काही खास कामगिरी करता आली नाही. सुपर 12 फेरीत बांग्लादेश आणि झिब्बाव्बेविरुद्ध सामन्यात त्यानं अर्धशतकं झळकावली. पण इतर सामन्यात त्याची बॅट शांतच दिसली. या स्पर्धेत राहुलनं सहा सामन्यात अवघ्या 128 धावा केल्या. तो पाकिस्तान विरुद्ध चार धावा, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 9 धावा आणि इंग्लंडविरुद्ध सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला.
2/12

भारताचा कर्णधार रोहित शर्मा संपूर्ण टी-20 विश्वचषकात संघर्ष करताना दिसला. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्याला फक्त 116 धावा करता आल्या. एवढंच नव्हे तर, इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात रोहित शर्मानं चुकीचं नेतृत्व आणि प्लेईंग इलेव्हन निवडल्याची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत रोहित शर्मानं भारताचा स्टार आणि अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहललं प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही.
Published at : 12 Nov 2022 07:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























