एक्स्प्लोर
Sunil Gavaskar Birthday: लिटल मास्टर सुनील गावस्कर... विक्रमांचा बेताज बादशाह!

(photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
1/8

Sunil Gavaskar Birthday:भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक अशी ओळख असलेले लिटल मास्टर सुनील गावस्कर आज 72 वर्षांचे झाले आहेत. (photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
2/8

सुनील गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे जगातील पहिले फलंदाज ठरले होते. ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य देखील होते. (photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
3/8

सुनील गावस्कर एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी दोन मैदानावर सलग चार शतकं ठोकली आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आणि वेस्ट इंडीजच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुनील गावस्कर यांनी सलग चार शतकं केली आहेत.(photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
4/8

सुनील गावस्कर यांना त्यांच्या शानदार कामगिरीमुळं 1980 मध्ये विस्डेन प्लेअर ऑफ द ईअर पुरस्कार मिळाला होता. सुनील गावस्कर यांच्या नावे आजही एका मालिकेत सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम अबाधित आहे. सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध एका मालिकेत 774 धावा केल्या होत्या. (photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
5/8

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सुनील गावस्कर यांनी दोन खणखणीत माईलस्टोन पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावा आणि 34 शतके.(photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
6/8

गावस्करांनी 100 हून अधिक वनडे सामनेही खेळले असले तरी गावस्करांची करिअर साकारली त्या काळात कसोटी क्रिकेटचंच गारुड सर्वांवर होतं. कसोटी क्रिकेट हेच अस्सल आणि खरं क्रिकेट असं मानणारा तो काळ होता. (photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
7/8

ज्या काळात मार्शल, रॉबर्टस, होल्डिंग, ओल्ड, अरनॉल्ड, विलीस, बॉथम, लिली, थॉमसन, इम्रान खान, सरफराज नवाझ, सर रिचर्ड हॅडली यासारखे तोफखाने आग ओकत. एकेका स्पेलमध्ये समोरच्या टीमच्या बॅटिंगचा पालापाचोळा करत. त्या गोलंदाजांसमोर गावस्कर सलामीला येऊन भारतीय धावसंख्येची मूळं मजबूत करत.(photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
8/8

वेगवान गोलंदाजीसमोर कणखरपणे उभं राहून खोऱ्याने धावा करता येतात, हे गावस्करांच्या दस हजारी परफॉर्मन्सने प्रूव्ह केलंय.(photo courtesy : @gavaskarsunilofficial instagram)
Published at : 10 Jul 2021 11:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
