एक्स्प्लोर
Rohit Sharma: द रोहित शर्मा... माही, विराटला मागे टाकत रोहित सुसाट, नावावर केला नवीन विक्रम
Ind vs SA T20I : दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.
![Ind vs SA T20I : दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/ed7e997a83854c9be21bbd97fb87a130166476199408484_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rohit Sharma Latest Photo india vs south Africa
1/10
![काल रविवारी रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) झालेल्या दुसऱ्या T20I सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवत 2-0 नं मालिका खिशात टाकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/fba1ec410d0715a4e7b4d0511fb78994f79ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल रविवारी रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) झालेल्या दुसऱ्या T20I सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवत 2-0 नं मालिका खिशात टाकली आहे.
2/10
![दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/bf12e1dce3d083b04690cc25fde0979a32f10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.
3/10
![रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/9480e3df89d274a16c6ce6c1341b4ed8714ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
4/10
![रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/6ff9dc16f96a97bc8254a763b0ddce7f6c1cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली.
5/10
![याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/325360edfd87be3498a69257aa93c370f7972.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.
6/10
![वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20मध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. भारताने यापूर्वी कधीही दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवले नव्हते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/4bdd0a92029bbb0cd8f7a2dd5bcb8523c504d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20मध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. भारताने यापूर्वी कधीही दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवले नव्हते.
7/10
![पण रोहित शर्माने रविवारी हा दुष्काळ संपवला आणि भारताला पहिला विजय मिळवून दिला. 2015 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/311acc2b7d0df3b70b4a9077bb14aa3e4a403.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण रोहित शर्माने रविवारी हा दुष्काळ संपवला आणि भारताला पहिला विजय मिळवून दिला. 2015 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळली होती.
8/10
![त्यादरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका 0-2 ने गमावली होती. यानंतर, 2019 आणि 2022 मध्ये दोन मालिका खेळल्या गेल्या आणि या दोन्ही मालिका अनिर्णित राहिल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/3a5b45903ef9507226131271b8f422ffaf81b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यादरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका 0-2 ने गमावली होती. यानंतर, 2019 आणि 2022 मध्ये दोन मालिका खेळल्या गेल्या आणि या दोन्ही मालिका अनिर्णित राहिल्या
9/10
![. 2019 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत संपली. त्याच वर्षी 5 सामन्यांची T20 मालिका 2-2 ने अशी बरोबरीत राहिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/f1be0072f7a6d8c7322a634ccb55c19a8274f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. 2019 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत संपली. त्याच वर्षी 5 सामन्यांची T20 मालिका 2-2 ने अशी बरोबरीत राहिली.
10/10
![मालिकेतील एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. या मालिकेत ऋषभ पंत भारताचा कर्णधार होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/8df35b084d39e73c62743e0cc88a26febe0d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकेतील एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. या मालिकेत ऋषभ पंत भारताचा कर्णधार होता.
Published at : 03 Oct 2022 07:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)