Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Parth Pawar Pune Land Scam: अंजली दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. परंतु त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासूनच रोखण्यात आले.

Parth Pawar Pune Land Scam: पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1800 कोटींच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे. मात्र या व्यवहारात एक रुपयाचाही आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही, असा दावा स्वतः अजित पवारांनी केलाय. तर संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आला असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. परंतु त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासूनच रोखण्यात आले. यानंतर संतप्त झालेल्या दमानिया यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी माहिती घ्यायला जागेवर आले. परवानगी नसेल तर आत सोडता येणार नसल्याचं बोटॅनिकल सर्व्हेचे अधिकारी बोलले. ते उद्धट आहेत. आम्हाला दोन जणांना जाऊ द्या, पाहणी करू द्या, ही परवानगी त्यांनी नाकारली. कोणाचे फोन आल्यावर त्यांनी नकार दिला हे माहित नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पत्रकार परिषद घेईल. मुठे समितीचा अहवाल आज येणार आहे. कोणताही अहवाल आला की, कोणतीही समिती अस म्हणू शकत नाही की, हे कायदेशीर झाले आहे. बॉटनिकल गार्डनला जागा लीजवर दिली होती. 2028 पर्यंत देण्यात आली होती. रिसर्चसाठी जमीन दिली होती. 16 जूनला इथे काही माणसांनी आत जाऊन तमाशे केले. ती कोण होती? याची माहिती घ्यायची होती. मात्र, त्यांनी मला परवानगी नाकारली होती. अधिकारी अतिशय उद्धट आहेत. लोक कशासाठी लढतात जे त्यांना माहीत नाही, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
Anjali Damania on Ajit Pawar: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण?
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? अजित पवारांनी राजीनामा द्यावा. दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर व्यवहार रद्द करण्याचा अधिकार त्यांना नाही. बावनकुळे म्हणतात पैसे नको. व्यवहार रद्द करून हवाय. हा व्यवहार मोदी पण रद्द करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. क्रिमिनल लायबिलिटी तपासत नाही, तोपर्यंत हा व्यवहार रद्द करता येत नाही. हा व्यवहार रद्द केला तर मी कोर्टात चॅलेंज करेल, असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला्.
आणखी वाचा























