एक्स्प्लोर
Junior Hockey World Cup : अर्जेंटिनानं दुसऱ्यांदा उंचावला विश्वषक; 4-2 फरकानं जर्मनीचा पराभव

(Photo tweeted by @ArgFieldHockey)
1/6

ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कपच्या (FIH Junior Men’s Hockey World Cup 2021) अंतिम सामन्यात जर्मनीवर मात करत अर्जेंटीनानं विजय मिळवला आहे. अर्जेंटिनानं जर्मनीला 4-2 च्या फरकानं पराभूत केलं. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
2/6

अर्जेंटिनानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 2005 मध्ये अर्जेंटिनानं किताब आपल्या नावे केला होता. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
3/6

जर्मनीनं यापूर्वी सहा वेळा हा किताब आपल्या नावे केला आहे. दरम्यान, यंदा सातव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या जर्मनीचं आव्हान अर्जेंटिनानं संपुष्टात आणलं. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
4/6

अर्जेंटिना दुसऱ्यांदा ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचा किताब आपल्या नावे करणारा तिसरा संघ ठरला आहे. जर्मनी (6 वेळा) व्यतिरिक्त भारतानं देखील 2001 आणि 2016 अशा दोन वेळा किताब आपल्या नावे केला आहे. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
5/6

ज्युनिअर हॉकी विश्वचषकामध्ये फ्रांसचा संघ तिसऱ्या आणि भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. भारताला सेमीफायनल्समध्ये जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तिसऱ्या स्थानाच्या सामन्यातही भारताचा फ्रांन्सनं पराभव केला. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
6/6

ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लोटारो डोमेननं तीन गोल डागले. तिनही गोल त्यानं पेनल्टी कॉर्नरवर डागले. लोटारोला यासाठी अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. फ्रँको एगोस्टोनिस्कोर्डनं अर्जेंटिनासाठी चौथा गोल डागला. जर्मनीसाठी ज्युलिअस हेनर आणि मासी फांन्टनं दोन गोल डागले. (Photo Credit : @FIH_Hockey/Twitter)
Published at : 06 Dec 2021 11:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
