मुख्यपृष्ठफोटो गॅलरीक्रीडाआयपीएलच्या इतिहासात सर्वांत जास्त अतिरिक्त धावा कोणी दिल्या?; अश्विन आघाडीवर, आकडा चक्रावणारा, पाहा यादी!
आयपीएलच्या इतिहासात सर्वांत जास्त अतिरिक्त धावा कोणी दिल्या?; अश्विन आघाडीवर, आकडा चक्रावणारा, पाहा यादी!
By : मुकेश चव्हाण | Updated at : 24 Mar 2024 02:03 PM (IST)
IPL 2024
1/11
22 मार्चपासून आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु झाला आहे. या लीगमध्ये जेव्हापासून वाइड आणि नो बॉलसाठी रिव्ह्यू सिस्टीम सुरू करण्यात आली आहे, तेव्हापासून ही लीग अधिक रंजक बनली आहे.
2/11
महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंनी अनेकदा सांगितले आहे की, टी-20 मध्ये नो बॉल किंवा वाइड हा गुन्हा आहे, जो गोलंदाजांनी टाळला पाहिजे. अतिरिक्त धाव कोणत्याही संघाच्या बाजूने खेळ बदलू शकते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का?, आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त एक्स्ट्रा धावा देणारे गोलंदाज कोण आहेत, तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या....
3/11
एक्स्ट्रा धावांमध्ये फक्त वाइड आणि नो बॉलचा समावेश होतो. या बाबतीत, एक गोलंदाज सर्वात वर आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दिग्गज आहे आणि अलीकडेच त्याने कसोटीत 100 बळी पूर्ण केले होते आणि 100 कसोटी खेळण्याचा पराक्रमही केला होता. विशेष म्हणजे या यादीत सातही गोलंदाज भारतीय आहेत.
4/11
अक्षर-रशीदने कधीही नो बॉल टाकला नाही- अक्षर पटेल आणि राशिद खान हे असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये 400 पेक्षा जास्त षटके टाकली आहेत आणि कधीही नो बॉल टाकला नाही.
5/11
1.आर. अश्विन (140 अतिरिक्त धावा)- आयपीएलमध्ये एक्स्ट्रा देण्यात भारताचा रविचंद्रन अश्विन अव्वल आहे. त्याने 136 वाईड आणि चार नो बॉलसह एकूण 140 अतिरिक्त धावा दिल्या आहेत. अश्विन सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग आहे.
6/11
2. भुवनेश्वर कुमार (139 अतिरिक्त धावा)- सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 160 डावात 128 वाइड आणि 11 नो बॉलसह एकूण 139 एक्स्ट्रा धावा दिल्या आहे. भुवनेश्वर कुमार काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे आणि तो या लीगमध्ये पुनरागमन करून आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
7/11
3. उमेश यादव (131 अतिरिक्त धावा)- उमेश यादवला यंदा गुजरात टायटन्सने आपल्या संघात समावेश केला आहे. या वेगवान गोलंदाजाने 140 डावात 107 वाईड आणि 24 नो बॉलसह एकूण 131 एक्स्ट्रा धावा दिल्या आहेत.
8/11
4. शार्दुल ठाकूर (106 अतिरिक्त)- आयपीएल 2024च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्समध्ये पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरने आतापर्यंत 83 डावांमध्ये 99 वाईड आणि सात नो बॉलसह एकूण 106 अतिरिक्त धावा दिल्या आहेत.
9/11
5. इशांत शर्मा (102 अतिरिक्त)- इशांत शर्मा हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. हा अनुभवी वेगवान गोलंदाज बऱ्याच काळानंतर तो ॲक्शनमध्ये दिसणार आहे. 100 पेक्षा जास्त कसोटी अनुभव असलेल्या इशांतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 80 वाइड आणि 22 नो बॉलसह एकूण 102 धावा अतिरिक्त धावा दिल्या आहे.
10/11
6. मोहम्मद सिराज (102 अतिरिक्त)- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजसाठी चिन्नास्वामी हे घरचे मैदान आहे, जिथे धावा काढणे खूप सोपे आहे. मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये एकूण 102 चेंडू जादा टाकले आहेत, ज्यात 94 वाइड आणि आठ नो बॉलचा समावेश आहे.
11/11
7. हर्षल पटेल (101 अतिरिक्त)- गेल्या मोसमापर्यंत बेंगळुरूकडून खेळलेला हा खेळाडू यंदा पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 101 एक्स्ट्रा बॉल टाकले आहेत, ज्यात 86 वाइड आणि 15 नो बॉलचा समावेश आहे. हर्षलने आयपीएल 2021 मध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु त्याशिवाय त्याची कामगिरी कोणत्याही आयपीएलमध्ये काही खास नाही.