एक्स्प्लोर
In Pics : भारतीय हॉकी संघाचा जपानवर दमदार विजय, 8-0 ने जिंकला सामना
IND vs JPN, Full time : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सुरु लढतींमध्ये सलामीच्या लढतीत भारताने जपानला मात दिली आहे.
IND vs JPN
1/10

भारतीय हॉकी संघाने हॉकी विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात जपान संघावर दमदार विजय मिळवला आहे.
2/10

तब्बल 8-0 अशा मोठ्या फरकाने भारताने हा विजय मिळवला आहे.
3/10

याआधी भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेबाहेर जावे लागले.
4/10

त्यानंतर आता सुरु वर्गीकरण सामन्यात भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
5/10

भारतीय भूमीत सुरु असणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये आजपासून (26 जानेवारी) वर्गीकरण सामने खेळणार आहे
6/10

वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत.
7/10

आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील विजयी संघ पुढे जाऊन नवव्या ते बाराव्या स्थानासाठी सामने खेळणार आहेत.
8/10

त्याचबरोबर पराभूत संघाला तेराव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळावे लागतील. आज भारतीय संघ वर्गीकरणाच्या सामन्यात जपानविरुद्ध मैदानात उतरला.
9/10

सामन्यात सुरुवातीपासून भारतीय संघ अप्रतिम खेळ दाखवत होता.
10/10

जपानच्या संघाला एकही गोल करता आला नाही पण सामन्यात भारताने मात्र तब्बल 8 गोल करत एका मोठ्या विजयाची नोंद केली.
Published at : 26 Jan 2023 11:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























