एक्स्प्लोर
Rohit Sharma : जे काही आहे ते सुरु राहील,.... अफवांना हवा देऊ नका, रोहित शर्माचं वनडेतील निवृत्तीच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर निवृत्तीबाबत मोठं भाष्य केलं. तो नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.
रोहित शर्मा
1/6

भारतानं न्यूझीलंडला 4 विकेटनं पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा तसा निर्णय घेऊ शकतो अशा अफवांना चर्चा आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद संपवताना रोहितनं निवृत्तीवर मोठं भाष्य केलं.
2/6

रोहित शर्मानं न्यूझीलंड विरुद्धची मॅच जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. यानंतर रोहितनं पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषद संपवताना रोहित शर्मानं निवृत्तीबाबत आवर्जून भाष्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही, अफवांना हवा देऊ नका, असं रोहित म्हणाला.
Published at : 10 Mar 2025 06:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























