एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या हसन अलीपासून ग्लेन मॅक्सवेलपर्यंत; विदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय वंशाच्या मुलीसोबत केलं लग्न
क्रिकेटमधील अनेक विदेशी खेळाडूंनी भारतीय वंशाच्या मुलींच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर लग्न केले.
glen maxwell
1/6

क्रिकेटमधील अनेक विदेशी खेळाडूंनी भारतीय वंशाच्या मुलींच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर लग्न केले. या यादीत पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हसन अलीचा देखील समावेश आहे.
2/6

हसन अली- पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या पत्नीचं नाव शामिया आरजू आहे. शामिया आरजू इंजीनियर आहे. शामिया भारतातील हरियाण येथील आहे.
3/6

शॉन टेट- ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न केले. शॉन टेटच्या पत्नीचं नाव माशू सिंघा आहे. आयपीएलमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर 12 जून 2014 रोजी दोघं विवाहबंधनात अडकले.
4/6

मोहसिन खान- पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहसिन खानने बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉयसोबत लग्न केले. लग्नानंतर मोहसिन भारतात आले आणि त्याने बॉलिवूडमध्ये काम केले. सध्या दोघांची घटस्फोट घेतला आहे.
5/6

मुथैया मुरलीधरन- श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरनने भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न केले होते. मुरलीधरनच्या पत्नीचं नाव राममूर्ती आहे, जी चेन्नईत राहत होती. दोघांनी 2005 साली लग्न केलं.
6/6

ग्लेन मॅक्सवेल- ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलच्या पत्नीचं नाव विनी रमन आहे. विनी आणि मॅक्सवेल हे दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करत होते. विनी आणि मॅक्सवेल यांनी 14 मार्च 2020 रोजी साखरपुडा उरकला. मात्र, कोरोनामुळे त्यांचं लग्न लांबणीवर गेलं होतं. दरम्यान, 18 मार्च 2022 रोजी भारतीय पद्धतीने त्याचं लग्न जोरात पार पडलं.
Published at : 24 Jun 2024 07:52 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग


















