एक्स्प्लोर
MS Dhoni: आयपीएलमध्ये खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या लेफ्टनंट जनरल एमएस धोनीला भारतीय सैन्यात किती पगार मिळतो?
MS Dhoni: धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 चा विश्वचषक जिंकला. त्यानंतर धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनवण्यात आले.
MS Dhoni
1/6

माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी खूप दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद आहे.
2/6

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 चा विश्वचषक जिंकला. त्यानंतर धोनीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनवण्यात आले. यानंतर, 2015 मध्ये, धोनीने पॅरा फोर्सेससोबत मूलभूत प्रशिक्षण आणि पॅराशूट जंपिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांना पॅरा रेजिमेंटमध्ये समाविष्ट करण्यात आले.
3/6

प्रादेशिक सेना ही एक सहाय्यक लष्करी संघटना आहे जी भारतीय सैन्याला मदत पुरवते. याला देशाचे दुसऱ्या फळीचे संरक्षण म्हणतात.
4/6

पगाराबद्दल बोलायचे झाले तर, लेफ्टनंट कर्नल पदासाठी धोनीला 1 लाख 21 हजार ते 2 लाख 12 हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. तथापि, त्याच्या पगाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
5/6

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने लष्करप्रमुखांना प्रादेशिक सैन्याच्या सदस्यांना बोलावण्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर धोनीलाही या काळात देशाची सेवा करण्यासाठी बोलावले जाऊ शकते.
6/6

धोनी यापूर्वी आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत होता. परंतु आता आयपीएल एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आले आहे. यावर्षी धोनीला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 4 कोटी रुपये मानधन मिळाले.
Published at : 11 May 2025 10:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























