एक्स्प्लोर
In Pics : भारतीय महिलांचा श्रीलंकेवर तब्बल 10 विकेट्सनी विजय, मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी

भारतीय महिला संघ
1/10

भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अतिशय दमदार विजयाची नोंद केली आहे
2/10

तब्बल 10 विकेट्सनी सामना जिंकत भारताच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना जोडीने एक नवा रेकॉर्डही केला आहे.
3/10

श्रीलंकेने दिलेल्या 174 धावा पूर्ण करताना भारतीय महिलांकडून सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप या दोघींनी उभारली.
4/10

या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. आधी टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिकाही खिशात घातली आहे.
5/10

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक पार पडली. भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला.
6/10

निर्णयाप्रमाणे भारतीय महिलांनी भेदक गोलंदाजी करत 172 धावांवर श्रीलंकेच्या महिलांना सर्वबाद केलं. श्रीलंकेकडून अमा कंचनाने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंहने सर्वाधिक 4 तर मेघना सिंह आणि दिप्ती शर्मा यानी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
7/10

174 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या भारतीय महिलांनी केवळ 25.4 षटकातच विजय मिळवला.
8/10

यावेळी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा जोडीने तुफान अशी नाबाद 174 धावांची भागिदारी उभारली.
9/10

यावेळी मंधानाने 83 चेंडूत 91 तर शेफालीने 71 चेंडूत 71 धावा करत आव्हान पूर्ण केलं. ज्यामुळे तब्बल 10 विकेट्सनी भारताचा विजय झाला.
10/10

रेणुका सिंहच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे तिला प्लॅअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.
Published at : 05 Jul 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
