एक्स्प्लोर
Ind vs Eng Test: इंग्लंडने गिलला निवडले अन् भारताने ब्रुकला; सामना संपताच गंभीर अन् मॅक्युलमने जे ठरवलं ते झालं, नेमकं काय केलं?
India Vs England Test: इंग्लंडने सामनावीर म्हणून भारताच्या शुभमन गिलला निवडले. तर भारताकडून सामनावीर म्हणून हॅरी ब्रुकला निवडण्यात आले.
Ind vs Eng Test
1/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने 6 धावांनी इंग्लंडचा पराभव केला.
2/9

या विजयासह भारताने पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली.
3/9

पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर मालिकावीर म्हणून शुभमन गिल आणि हॅरी ब्रुकला निवडण्यात आले.
4/9

दरम्यान, इंग्लंडने सामनावीर म्हणून भारताच्या शुभमन गिलला निवडले. तर भारताकडून सामनावीर म्हणून हॅरी ब्रुकला निवडण्यात आले. पण हे नेमकं कसं झालं?, जाणून घ्या...
5/9

अलिकडच्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये असे ठरवले गेले आहे की कसोटी मालिका कोणतीही असो, ती मालिका कोण जिंकेल यावर अवलंबून न ठेवता, दोन्ही संघांतील प्रत्येकी एका खेळाडूला 'प्लेयअर ऑफ द सिरीज' दिला जाईल. या निवडीची जबाबदारी दोन्ही संघांचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
6/9

उदाहरणार्थ, इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलम यांनी शुभमन गिलला हा सन्मान दिला. तर भारतीय कोच गौतम गंभीर यांनी हॅरी ब्रूकला प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून निवडले.
7/9

सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. मालिकेत हॅरी ब्रूकने चांगली खेळी केली असली, तरी जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत इंग्लंडसाठी महत्वाची भूमिका बजावली.
8/9

जो रूटने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, तर बेन स्टोक्सने संकटाच्या क्षणी दमदार योगदान दिलं. तरीही गंभीरने थेट हॅरी ब्रूकला इंग्लंडकडून प्लेयर ऑफ द सिरीज म्हणून जाहीर केलं. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त करत गंभीरवर पक्षपात केल्याचे आरोप केले आहेत.
9/9

भारतीय कर्णधार शुभमन गिल इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिलने 5 सामन्यांच्या 10 डावात 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या. यादरम्यान त्याने एका द्विशतकासह 4 शतके केली.
Published at : 06 Aug 2025 08:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
























