एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 : भारत इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत, मायकल वॉन अन् हरभजन सिंग भिडले, काय घडलं?
T20 World Cup 2024 : भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन आणि हरभजन सिंग आमने सामने आले.
हरभजन सिंग मायकल वॉन
1/5

भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला.
2/5

भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 171 धावा केल्या. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या दमदार फलंदाजीचा समावेश होता. रोहितनं 57 धावा तर सूर्यकुमारनं 47 धावा केल्या.
3/5

इंग्लंडनं 2022 प्रमाणं आक्रमक फलंदाजीचं धोरण स्वीकारलं ते त्यांच्या अंगलट आलं. रोहित शर्मानं खेळपट्टीचा अंदाज घेत फलंदाजी केली. दुसरीकडे इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर आक्रमक खेळी करण्याच्या नादात अक्षर पटेलला विकेट देऊन बसला. अक्षर पटेलनं 3, कुलदीप यादवनं 3, जसप्रीत बुमराहनं 2 विकेट घेतल्या.
4/5

भारताच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं यावर भाष्य करताना म्हटल की, इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर त्यांना त्रिनिदाद मध्ये खेळण्याची संधी मिळाली असती. तिथं त्यांनी मॅच जिंकली असती, असा विश्वास आहे, असं वॉन म्हणाला. इंग्लंडचा कोणत्याही तक्रारी नाहीत मात्र टीम इंडियासाठी गयाना चांगलं ठिकाण होतं, असं म्हटलं.
5/5

हरभजन सिंगनं मायकल वॉनला यावरुन प्रश्न विचारले. तुम्हाला गयाना भारतासाठी चांगलं ठिकाण कसं वाटतं? दोन्ही संघांनी या ठिकाणी क्रिकेट खेळलं आहे. इंग्लंडनं टॉस जिंकला होता, त्यांच्याकडे अॅडव्हान्टेज होते. मूर्खपणा थांबवा, भारतानं इंग्लंडपेक्षा सर्व विभागात चांगली कामगिरी केली. वस्तूस्थिती मान्य करा,तुमच्या गोष्टी तुमच्यासोबत ठेवा पण तुम्ही लॉजिकनं बोला, असं हरभजन सिंग म्हणाला.
Published at : 28 Jun 2024 11:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























