सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण दांडी येथे महाकाय जेलिफिश सापडला आहे. दांडी येथील रापणीच्या जाळ्यात हा जेलिफिश सापडला. आठ दिवसांपूर्वीही याच समुद्रात जेलिफिश सापडले होते.
2/5
सायनिया रोझी या प्रजातीतील हा महाकाय जेलिफिश ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड लगतच्या पॅसिफिक महासागरात पाहायला मिळतो. महाराष्ट्रात या प्रजाती नोंद सर्वप्रथम मालवण मध्ये झाली आहे.
3/5
सायनिया ही जेली फिशची प्रजाती प्रामुख्याने उत्तर अटलांटिक आणि उत्तर पॅसिफिक महासागरात सापडते. तसेच ऑस्ट्रेलियाच्या लगत पॅसिफिक महासागरातही ही प्रजाती सापडते. (Photo credit: Dan Hershman)
4/5
सायनिया रोझी या प्रजातीचा जेलिफिश एकटाच राहत असतो. इतर जेलिफिश प्रमाणे तो झुंडीत पहायला मिळत नाही. या देशातून त्या देशात ये जा करणाऱ्या जहाजामुळे कदाचित स्थलांतरित झाला असल्याची शक्यता आहे. (Photo Credit: : Geograph.ie)
5/5
या महाकाय जेलिफिशचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्था वर्सोवा, मुंबईची टीम लवकरच मालवण मध्ये येणार आहे. (Photo credit: Denes Riek)