एक्स्प्लोर
Astronauts Return : 6 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले तीन चिनी अंतराळवीर, अवकाशातील अनुभव कसा होता? जाणून घ्या...
China Astronauts Return : सहा महिन्यांनंतर तीन अंतराळवीर (Astronauts) सुखरुप पृथ्वीवर (Earth) परतले आहेत. हे तिन्ही अंतराळवीर चीनचे आहेत.

China Astronauts Return Safely on Earth
1/8

चिनी स्पेस स्टेशनने (Chinese Space Station) दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 3 अंतराळवीर रविवारी, 4 जून रोजी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत.
2/8

फेई जुनलाँग, डेंग किंगमिंग आणि झांग लू अशी या अंतराळवीरांची नावे आहेत. हे तिन्ही अंतराळवीर चीनच्या शेन्झोउ-15 यानातून पृथ्वीवर उतरले.
3/8

हे अंतराळयान गेल्या सहा महिन्यांपासून अंतराळात होते. हे यान आणि अंतराळवीर हजारो किमी दूर ते चिनी स्पेस स्टेशन तयार करण्याच्या मोहिमेवर काम करत होते.
4/8

चीनने एका मोहिमे अंतर्गत तीन मानवांना अंतराळात पाठवलं होतं. हे अंतराळवीर आता मोहिम संपल्यानंतर सुखरुप जमिनीवर परतले आहेत.
5/8

पृथ्वीच्या बाहेर जाऊन सहा महिने अंतराळात राहिलेले या तिघांचा तिथला अनुभव कसा होता ते जाणून घ्या?
6/8

चीनच्या अंतराळ संस्थेने अधिक माहिती देत सांगितलं आहे की, फेई जुनलाँग, डेंग किंगमिंग आणि झांग लू 4 जून रोजी सकाळी 6:33 वाजता उत्तर चीनमधील डोंगफेंग लँडिंग साइटवर सुरक्षितपणे उतरले.
7/8

अंतराळवीर झांग यांनी म्हटलं की, "माझ्या देशात परतताना मला खूप आनंद होत आहे. आता आम्हांला पृथ्वीनुसार आपल्या शरीराची रचना करायची आहे. त्यासाठी थोडा वेळ लागेल." अंतराळवीरांनी सांगितले की ते पुन्हा प्रशिक्षण घेऊन भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी सज्ज होतील.
8/8

यापूर्वी, 30 मे रोजी एका नागरिकासह तीन अंतराळवीरांना जुनलाँग, किंगमिंग आणि लू यांना चीनी अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलं होतं. अंतराळवीरांची ही नवी टीम पाच महिने अंतराळ स्थानकात राहणार आहे.
Published at : 05 Jun 2023 01:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
