इजिप्तचा सुएज कॅनॉल म्हणजे समद्रातील 193.3 किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कॅनॉलवर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दे झाली आहेत. सध्या सुएज कॅनॉल इजिप्तच्या ताब्यात आहे.
2/6
सुएज कॅनॉल भूमध्य सागरला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडतो. म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.
3/6
चीनमधून माल भरुन एक जहाज नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कॅनॉलमध्ये फसलं. चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कॅनॉलमध्ये फसलं.
4/6
समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं. त्यामुळे या कॅनॉलमध्ये जहाज अडकलं.
5/6
त्यामुळे समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं पहायला मिळतंय. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असं सांगण्यात येतंय.
6/6
याच रस्त्याने सर्व लहान-मोठे जहाजं प्रवास करतात. हा समुद्री मार्ग जर मोठ्या काळासाठी बंद राहिला तर या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते आशिया असा प्रवास करावा लागेल.