एक्स्प्लोर
IN PICS | जागतिक आनंदी देशांच्या क्रमवारीत भारताचा 139 वा क्रमांक ; पाहा या यादीत नेमक्या कोणत्या देशांचा समावेश आहे

जागतिक आनंदी देशांच्या क्रमवारीत भारताचा 139 वा क्रमांक
1/8

UN Sustainable Development Solutions Networkच्या वतीनं जगातील आनंदी देशांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 149 देशांचा समावेश असून, त्यामध्ये भारताचा क्रमांक 139 वा आहे.
2/8

वार्षिक दरडोई उत्पन्न, आरोग्यदायी आयुष्य़ाबाबतच्या अपेक्षा आणि स्थानिकांची मतं या निकषांच्या आधारावर ही यादी तयार करण्यात आली. ज्यामध्ये भारत 139 व्या स्थानावर असतानाच पाकिस्तान मात्र 105 स्थानावर आहे. तर बांगलादेश आणि चीन अनुक्रमे 101 आणि 84 व्या स्थानावर आहेत.
3/8

फिनलँड हा देश जगातील सर्वाधिक आनंदी देश म्हणून गणला गेला असून, चौथ्या वर्षीही हे स्थान अबाधित राहिलं आहे. यामागे डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स या देशांचा समावेश आहे. नॉर्वे हा देश सहाव्या क्रमांकावर असून, त्यामाहे स्वीडन, लक्समबर्ग., न्यूझीलंड, ऑस्ट्रीया या राष्ट्रांचा समावेश आहे.
4/8

कोविड काळाचा नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम झाला आणि सदर राष्ट्रांमध्ये सरकारकडून नेमका जनतेला कशा प्रकारे आधार देण्यात आला या निकषांच्या आधारे राष्ट्रांचा क्रम ठरवण्यात आला.
5/8

या यादीत ऑस्ट्रेलिया 11 व्या स्थानावर असून, इस्रायल, जर्मनी, कॅनडा आणि आयर्लंड अनुक्रमे 12, 13, 14 आणि 15 व्या स्थानावर आहेत.
6/8

कोस्टा रिकाला सोळाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे, तर युके आणि युएसए यांसारख्या प्रगत राष्ट्रांना अनुक्रमे 17 आणि 19 व्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे.
7/8

या यादीच चेक रिपब्लिक व्या आणि बेल्जियम 20 व्या क्रमांकावर आहे. आनंदी नसणाऱ्या राष्ट्रांमध्ये, भारत, बुरुंडी, येमेन, टांजानिया, हैती, मालावी, लेसोथो, रवांडा, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान या राष्ट्रांचा समावेश आहे.
8/8

'यात काहीच शंका नाही की कोविड 19 या महामारीमुळं मानसिक स्वास्थ्य आणि त्यामुळं झालेल्या परिणामांचं प्रमाण जास्त होतं. नकारात्मक आणि सातत्यपूर्ण होतं. हे परिणाम महिला आणि युवा गटात जास्त दिसून आले.', अशीही माहिती या यादीच्या निमित्तानं सादर करण्यात आलेल्या अहवालातून देण्यात आली.
Published at : 20 Mar 2021 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
