एक्स्प्लोर
Godwit Bird World Record : 11 दिवस न थांबता प्रवास, गॉडविट पक्ष्याच्या नावे नवा विक्रम; 13,560 किमी उड्डाण
Godwit Bird World Record : एका पक्ष्याने 11 दिवस सतत उड्डाण केले आणि 13,560 किलोमीटरचे अंतर कापले आहे.
Godwit Bird World Record
1/10

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, गॉडविट पक्ष्याने सलग 11 व्या उड्डाण करून 13,560 किलोमीटर अंतर कापत विश्वविक्रम केला आहे. (PC:unsplash)
2/10

काही शास्त्रज्ञांनी एका गॉडविट पक्ष्याला (Godwit Bird) टॅग केले आणि त्याला पुन्हा त्याच्या सहवासात सोडले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी टॅगद्वारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. (PC:unsplash)
3/10

शास्त्रज्ञांना निरीक्षण करताना आढळले की, या पक्ष्याने सतत 11 दिवस उड्डाण केलं आहे. (PC:unsplash)
4/10

हा पक्षी 11 दिवस न थांबता उडत होता आणि यावेळी त्याने सुमारे 13,560 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या पक्षाच्या नावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. (PC:unsplash)
5/10

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या गॉडविट पक्षाची सर्वाधिक वेळ उड्डाण करणाऱ्या आणि सर्वाधिक अंतर कापणाऱ्या अंतराच्या विक्रमाची नोंद झाली आहे. (PC:unsplash)
6/10

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या गॉडविट पक्ष्याने 12 ऑक्टोबर 2022 रोजी अमेरिकेतील अलास्का येथून प्रवास सुरू केला आणि हा 11 व्या दिवशी ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथे थांबला. (PC:unsplash)
7/10

दरम्यान या पक्ष्याने 13,560 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या पक्ष्याने 11 दिवस सतत न थांबता उडत राहिला आणि प्रवास पूर्ण केला. (PC:unsplash)
8/10

शास्त्रज्ञांनी या गॉडविट पक्षाच्या पाठीच्या खालच्या बाजूला 5G सॅटेलाईट टॅग लावला होता, ज्याच्या मदतीने शास्त्रज्ञ या पक्षाचा आणि त्याच्या हालचालींना मागोवा घेत होते. (PC:unsplash)
9/10

2020 मध्ये याच प्रजातीच्या एका पक्ष्याने सर्वात लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्याचा विक्रम यापूर्वी केला होता. यावेळी या पक्ष्याने एका उड्डाणात 350 किलोमीटरचे अंतर कापले होते. (PC:unsplash)
10/10

गॉडविट पक्ष्याचा आकार फायटर प्लेनसारखा असतो. या पक्ष्याचे वजन 230 ते 450 ग्रॅमपर्यंत असते. गॉडविट पक्ष्याच्या पंखांची रुंदी सुमारे 70 ते 80 सेमीपर्यंत असते. (PC:unsplash)
Published at : 15 Jan 2023 02:00 PM (IST)
आणखी पाहा























