एक्स्प्लोर
कुणी नेसल्या साड्या, तर कुणाच्या हातात ब्लाऊज; बकरी, मासे अन् बरंच काही; आंदोलकांनी लुटलं शेख हसीनांचं घर
Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थाात शिरले, फर्नीचर आणि भांड्यांची तोडफोड, शेख मुजिबूर रेहमान यांच्या पुतळ्याचीही विटंबना.

Bangladesh Violence
1/11

Bangladesh Violence : सध्या संपूर्ण जगाच्या नजरा बांगलादेशकडे वळल्या आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.
2/11

बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
3/11

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थाात शिरले आणि तिथे मोठा गोंधळ घातला.
4/11

पंतप्रधान आवासामधील फर्नीचर आणि भांड्यांची तोडफोड केली आणि शेख मुजिबूर रेहमान यांच्या पुतळ्याचीही आंदोलकांनी विटंबना केली.
5/11

image 7
6/11

एवढंच काय तर, आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानातून ब्रा, मासे, साडी, ब्लाऊज, कपडे चोरले. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर, त्यांनी कचऱ्याचे डब्बेही लुटले.
7/11

पंतप्रधान आवासात शिरलेल्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. तसेच, शेख हसीना यांच्या कपाटातील साड्या काढून त्या स्वतः नेसल्या. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/11

आंदोलकांनी स्वयंपाक घराचा ताबा घेतला. तिथे बसून जेवणंही केलं. त्यानंतर त्या स्वयंपाक घरातली भांडीही जाताना घेऊन गेले.
9/11

1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात आंदोलन सुरू झालं होतं.
10/11

आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झालं. ते एवढं विकोपाला गेलं, की बांगलादेशातील वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळालं.
11/11

लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला.
Published at : 06 Aug 2024 09:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
