एक्स्प्लोर
काय सांगता...? 8 फूट उंचीचा iPhone, पाहून डोळे विस्फारतील; यूट्यूबरचा पराक्रम
Biggest Size iPhone : एका यू-ट्यूबरने माणसापेक्षाही जास्त उंच 8 फुटाचा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा आयफोन बनवला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
YouTuber Creates 8 Foot Big iPhone
1/8

आजकाल सोशल मीडियाचा वापर वेगाने वाढत आहे. सोशल मीडिया आणि त्यातल्या त्यात यू-ट्यूब हा प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा आणि उत्तम मार्गही बनला आहे.
2/8

काही यू-ट्यूबर वेगळे आणि विचित्र पराक्रम करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न. असाच एक यू-ट्यूबर आणि त्याचा सध्या चर्चेत आहे.
3/8

अलिकडे आयफोनच्या नवनवीन मॉडेल्सची अनेकांच्या मनाला भुरळ पडते. आयफोनचा आकार साधारणपणे एक फुटापेक्षाही कमी असतो. पण तुम्ही 8 फूट आकाराचा माणसाच्या उंचीपेक्षाही मोठा आयफोन पाहिला आहे का?
4/8

सध्या सोशल मीडियावर माणसापेक्षाह जास्त उंचीच्या आयफोनचा फोटो व्हायरल होत आहे.
5/8

मिस्टर बीम या अमेरिकन यू-ट्यूबर आणि त्याच्या टीमने 8 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा आयफोन बनवला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
6/8

अमेरिकन यू-ट्यूबवर (YouTuber) मॅथ्यू बीमने (Matthew Beem) Apple च्या सर्वात महागड्या फोन iPhone 14 Pro Max चं मॉडेल तयार केलं आहे. विशेष म्हणजे याची लांबी 8 फूट आहे
7/8

या सर्वात मोठ्या आयफोनमध्ये साधारण आयफोनमधील सर्व फिचर नाहीत. हा फोन तयार करताना टीव्हीच्या टच स्क्रिनचा वापर करण्यात आला असून त्याला मिनी मॅक जोडण्यात आला आहे. या आयफोनमध्ये लॉक बटण, आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही बटण जोडण्यात आलं आहे.
8/8

बीमने या आयफोनवर व्हिडीओ गेम खेळला. फोटो काढले इतकंच नाही तर भारतातील एका मित्रासोबत व्हिडीओ कॉलवरून संवादही साधला. सध्या हा 8 फूट आकाराच्या आयफोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा आठ फूट आकाराचा आयफोन बीमने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरवला आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
Published at : 30 Jun 2023 12:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























