एक्स्प्लोर
अरेच्चा...! एक-दोन नव्हे 'या' प्राण्याला आहेत 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात, आयुर्वेदीक उपचार पद्धतीत वापर
Interesting Facts : 'या' प्राण्याला 32 मेंदू, 300 दात आणि 10 डोळे; आयुर्वेदीक उपचारांसाठी केला जातो वापर, हा प्राणी कोणता? जाणून घ्या...

Leech Interesting Facts
1/11

काही इतर सजीवांपेक्षा वेगळे असल्यामुळे खास असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत. या प्राण्याबद्दल विशेष म्हणजे याला 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात आहेत.
2/11

जळू हा प्राणी तुम्हाला माहित असेल. याला रक्त शोषणारा जळू, जळवा किंवा लीच (Leech) असंही म्हटलं जातं.
3/11

माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला मेंदू असतो, पण 'जळू' या प्राण्याच्या शरीरात 1 नव्हे तर 32 मेंदू आढळतात. पण 32 मेंदू असूनही जळू मानवाच्या एका मेंदूची बरोबरी करु शकत नाही.
4/11

जळू या प्राण्याला 32 मेंदू असतात. इतकंच नाही तर जळूला 3 जबडे असतात आणि प्रत्येक जबड्याला 100 दात असतात.
5/11

या दातांच्या मदतीने ती मानवी शरीरातून रक्त शोषते. आम्ही तुम्हाला सांगतो की जळू त्याच्या वजनापेक्षा 10 पट जास्त रक्त शोषू शकते.
6/11

जळूला 10 डोळे असतात. या डोळ्यांद्वारे जळू गडद आहे की प्रकाश हे ओळखते, तसेच वेग आणि आकार याचाही अंदाज जळूला डोळ्यांमार्फत येतो.
7/11

जळूचे शरीर 32 तुकड्यांमध्ये विभागलेले असते, हे तुम्हाला जळूचं शरीर पाहिल्यावर कळेल. जळूला या प्रत्येक भागात एक स्वतंत्र मेंदू असतो.
8/11

मूळात हे 32 मेंदू नसून एकच मेंदू आहे, जो 32 तुकड्यांमध्ये विभागलेला गेला आहे. 32 तुकड्यांमध्ये विभागलेलं असलं तरीही जळूचे शरीर जोडलेलं असतं.
9/11

जळूच्या 32 भागांपैकी प्रत्येक भागाची स्वतःचं गॅंग्लिया (Ganglia) म्हणजे एक प्रकारचा मज्जातंतू (Nervous System) असतो, या द्वारे प्रत्येक भाग एकमेकांसोबत जोडलेला असतो.
10/11

जळू म्हणजे जळवा (Leech) माणूस आणि जनावराचं रक्त शोषण्यासाठी ओळखला जातो. रक्त शोषणारा हा जळू आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
11/11

काही विशिष्ट प्रकारच्या वळूंचा विविध आजारांवरील उपचारासाटी वापर केला जातो, याला लीच थेरपी असं म्हणतात.
Published at : 16 Jun 2023 02:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
