एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2024 : 'सोलापूर' शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी; भव्य 'पाळणा' सोहळा उत्साहात पार..
Shiv Jayanti 2024 : महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री 12वाजता श्री शिवजन्मोत्सव!
महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री 12वाजता श्री शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
1/10

सोलापूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
2/10

सोलापुरात शिवजन्मोत्सवाची सुरुवात पाळण्याने करण्यात आली. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
3/10

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
4/10

शिवाजी चौकामध्ये पाळणा कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
5/10

या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निदर्शनाखाली शिवाजी चौकामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
6/10

या भव्य पाळणा सोहळ्यासाठी महिलावर्ग नऊवारी साडी आणि पारंपारिक वेशभूषा करून शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
7/10

रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
8/10

शिवव्याख्याते दीपकराव करपे यांचे राजमाता जिजाऊ मासाहेब, वीरांगणा आणि लोकशाही मधील रणरागिनी, न उमजलेले छत्रपती शिवराय या विषयावरती रात्री दहा ते अकरा या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
9/10

या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या सिंदखेड राजा येथील वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे यांसोबतच अजून प्रमुख मंडळी आले होते. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
10/10

सर्व प्रमुख प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाळणा उत्सव संपन्न झाला. (फोटो सौजन्य : प्रवीण गायकवाड)
Published at : 19 Feb 2024 11:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























