एक्स्प्लोर
NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात 25 वा वर्धापनदिन साजरा, कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित.
NCP Foundation Day
1/11

आज राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा झाला (PC:PTI)
2/11

पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं (PC:PTI)
3/11

राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज दुपारी 12 वाजता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते (PC:PTI)
4/11

Sharad Pawar यांच्याकडून ध्वजवंदन (PC:PTI)
5/11

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. (PC:PTI)
6/11

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत. (PC:PTI)
7/11

दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. (PC:PTI)
8/11

तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धपान कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा केली आहे. (PC:PTI)
9/11

अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. अजित पवार या घोषणेवेळी दिल्लीत उपस्थित होते. (PC:PTI)
10/11

शरद पवारांनी चेंबूर येथील सभेत पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते असं म्हणत एक इशारा दिला होता.(PC:PTI)
11/11

त्यानंतर 'लोक माझे सांगाती' याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. (PC:PTI)
Published at : 10 Jun 2023 05:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























