एक्स्प्लोर
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत आजही मदत आणि बचावकार्य सुरु
Irshalwadi Landslide : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जीव शोधण्याचा प्रयत्न आजही एनडीआरएफचे जवान करत आहेत.
Irshalwadi Rescue Operation
1/7

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जीव शोधण्याचा प्रयत्न आजही एनडीआरएफचे जवान करत आहेत. चार तुकड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या आहेत.
2/7

या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आता कलम 144 लागू केलं आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेटिंग केली असून अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही पोलीस सोडत नाहीत
3/7

गेल्या तीन दिवसांत एकूण 27 मृतदेह सापडले असून, अद्याप 78 जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
4/7

काल पाच जणांचे मृतदेह काल हाती लागले, त्यांच्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
5/7

दरड दुर्घटनेत वाचलेले 76 जण आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. घडलेल्या प्रसंगातून ते अजून सावरलेले नाहीत.
6/7

भविष्यात त्यांच्या मनावर आघात होऊ शकतो. यासाठी मानसोपचारतज्ज्ञांमार्फत त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
7/7

रायगडमधील इर्शाळवाडी इथे 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Published at : 23 Jul 2023 01:03 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















