एक्स्प्लोर
Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि गौतम अदानीसोबतचा फोटो दाखवून राहुल गांधींचे घणाघाती आरोप..
भारत जोडो यात्रा संपवून संसदेत आलेल्या राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर सभागृहात घणाघाती टीका केली. त्यावेळी त्यांनी गौतम अदानी सोबत पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीचा फोटो सभागृहात दाखवला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा आरोप केला
1/10

भारत जोडो यात्रेचा समारोप झाला तरी राहुल गांधी आपला लूक बदललेला नाही. वाढलेली दाढी घेऊनच राहुल गांधी यांनी संसदेत प्रवेश केला. सीपीएमचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी राहुल गांधी याचं स्वागत केलं. (PTI Photo/Kamal Singh)
2/10

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी संसदेत दाखल होत असताना टिपलेला त्यांचा फोटो. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या दररोज उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत चिरंजीव आणि केरळमधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सहमती झाली. यामुळे अदानी प्रकरणावरुन सुरु असलेला तिढा काही प्रमाणात का होईना सुटायला मदत झाली. (PTI Photo)
Published at : 07 Feb 2023 08:43 PM (IST)
आणखी पाहा






















